जो पुढारी बनू शकतो त्याने राजकारणात यावे.
अर्थात हे त्याला सांगावे लागत नाही. तो राजकारणात येतोच.
आता यशस्वी पुढारी कोण? ज्याला अनुयायी मिळतात आणि ज्याचे अनुयायी टिकून राहतात तो पुढारी.
अनुयायी मिळवणे आणि ते टिकवून ठेवणे ह्याला कुठला मार्ग वापरला आहे ते पुढारी आणि अनुयायी कोण त्यावर अवलंबून आहे.
आता ज्याने त्याने ठरवावे कुठल्या अनुयायांचे पुढारीपण आपल्याला करायचे आहे आणि त्यासाठी जे लागेल ते करायची आपली त्ययारी आहे का?
नुसते आपण सभ्य आहो, शहाणे समजूतदार ज्ञानी आहो म्हणून पुढारी होऊ असे नव्हे.