सुमारे ४०-५० वर्षांपूर्वी एका सरकारी ऑफिसात तिथे घडलेल्या एका प्रेमप्रकरणाची चर्चा (खरे तर गॉसिपिंग) कानावर येत असे. त्यात संबंधित व्यक्तींच्या जातीचा स्वच्छ उल्लेख होत असे. (कथेत तो ओझरता आहे). चर्चेत "आता तरी तयार आहे का? " या वाक्यावर हशा पिकत असे. तो धागा पकडून, कल्पनेनी थोडे नाट्य निर्माण करून कथा लिहिली आहे. त्यात कुठलाही संदेश देण्याचा, प्रबोधनाचा वा विचारांना चालना देण्याचा हेतु नाही.