ज्यांना काहीजण इंग्रजी आकडे म्हणतात ते आकडे इंग्रजी नाहीत. त्या आकड्यांना हिंदू आकडे म्हणतात. ते हिंदुस्थानातून अरबस्तानात गेले आणि तिथून युरोपात. अजूनही त्या आकड्यांना हिंदू-अरेबिक न्यूमरल्स असेच म्हणतात. जगातल्या सर्व देशांत आणि महाराष्ट्र-गुजराथ सारख्या दोन चार प्रांतांशिवाय उरलेल्या भारतात हेच हिंदू आकडे वापरले जातात. धार्मिक वाङ्मय आणि ललित साहित्य सोडल्यास अन्यत्र मराठी आकड्यांऐवजी हेच हिंदू आकडे वापरणे सर्वांच्या हिताचे आहे. प्रत्येक प्रांताने आपापले आकडे मोटार गाड्यांच्या नंबर प्लेटवर वापरायचे ठरवले तर अपघात करून पळून जाणाऱ्या गाडीचा शोध घेणे शक्य होणार नाही. परदेशातल्या चेकचे नंबर वाचता येणार नाहीत. बसचे नंबर, ट्रेनचे नंबर वाचता आले नाहीत तर भारतातच प्रवास करणे अशक्य होईल, परदेशात तर सोडूनच द्या. फार काय, परप्रांतातल्या घड्याळ्याने दाखवलेली वेळ समजणार नाही.
जोपर्यंत मराठीत ललित वाङ्मय आहे तोपर्यंत मराठी आकडे राहणारच. उगाच काळजी करू नये.
तथाकथित इंग्रजी आकडे ज़िन्दाबाद! -SHUDDHA MARATHI.