pप्राज्क्ता आपल्या जुन्या सदस्य आहेत.
त्या जुन्या सदस्य आहेत की नवीन हा मुद्दा नाही.
त्यांचे घेतलेले नाव असेच आहे.
त्यांनी
कोणते व कसे सदस्यनाम घ्यावे ह्याविषयी माझे काहीही म्हणणे नाही. तो
सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. मात्र अशा प्रकारचे नाव धारण करून मग
वर्तमानपत्रांच्या, माध्यमांच्या, किंबहुना कोणाच्याही अशुद्धलेखनाविषयी
आक्षेप घेण्यात मला विसंगती दिसते. "मराठी भाषेची लक्तरे वेशीवर टांगणे माध्यमांनी बंद करावे ही माफक अपेक्षा"
जाहीरपणे
व्यक्त करणाऱ्यांकडून इतरांनी तीच (माफक) अपेक्षा बाळगण्यात काय
गैर आहे ? राहिला प्रश्न संकेताचा, तर उक्ती व कृतीमध्ये फरक असू नये हा
ही एक संकेत आहे. "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले" पटते की "डू ऍस आय
से,
डोन्ट डू ऍस आय डू" पटते ?