मात्र अशा प्रकारचे नाव धारण करून मग वर्तमानपत्रांच्या, माध्यमांच्या,  किंबहुना कोणाच्याही अशुद्धलेखनाविषयी आक्षेप घेण्यात मला विसंगती दिसते.

आपल्या सदस्यनामामागील लॉजिकबद्दल कदाचित केवळ खुद्द लेखिकाच काय तो खुलासा करू शकेल, परंतु आपण म्हणता ती बाब ही वरकरणी विसंगती वाटत असली, तरी सर्व परिस्थितींत विसंगती असेलच असे नाही, असे वाटते. उदाहरणार्थ, कदाचित वर्तमानपत्रांतील किंवा माध्यमांतील अशुद्धलेखनावर टीका करण्यासाठी किंवा त्याची खिल्ली उडवण्यासाठी किंवा अशा प्रकारच्या अन्य कोणत्या कारणामुळे असे सदस्यनाम यदाकदाचित मुद्दाम घेतले असेल, किंवा अशा सदस्यनामामागे असेच एखादे लॉजिक अस्तित्वात असेल (जे लेखिकेव्यतिरिक्त इतरांस सहजगत्या गम्य नसेल), तर त्या परिस्थितीत यात काही विसंगत आहेच, असे म्हणता येणार नाही. मात्र अशा कारणाअभावी किंवा लॉजिक‌अभावी केवळ चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे अशा प्रकारचे सदस्यनाम जर घेतले गेले असेल, तर त्या परिस्थितीत कदाचित आपला विसंगतीबद्दलचा आक्षेप रास्त ठरावा.

असे सदस्यनाम घेण्यामागील विचारांबाबत अधिक माहितीअभावी यात काही विसंगती आहे अथवा नाही हे निश्चितपणे ठरवणे कठीण आहे असे वाटते.

(तसेही सदस्यनाम - आणि कदाचित 'मल्ल्याळम' असा लिहिलेला शब्द - वगळता लेखिकेच्या लेखनात फारसे कोठे काही अशुद्ध असल्याचे जाणवले नाही. अर्थात हे शुद्धिचिकित्सकामुळे झाले असणेही शक्य आहे, हा भाग वेगळा.)