माझी सह्यभ्रमंती ... ! येथे हे वाचायला मिळाले:
शिवमंदिरापाशी थांबलो होतो तेंव्हा हेडटॉर्चच्या प्रकाशात खादू-पिदू झाले आणि आम्ही सगळे शेवटच्या टप्याच्या चढाईला लागलो. पुन्हा एकवार राजेश सर्वात पुढे आणि मी सर्वात मागे. निघताना शिवपिंडीला नमस्कार केला. मंदिराकडे तोंड करून उभे राहिलात की तुमच्या बरोबर उजव्या बाजूला थेट वरती गोरखगडाचे प्रवेशद्वार आहे. चालायला म्हणजे चढायला सुरुवात केली. १० पावले वर चढलो की लगेच दगडामध्ये खोदलेल्या पायऱ्या सुरू होतात. इकडे जरा काळजीपूर्वक कारण बऱ्याच पायऱ्या तूटलेल्या आहेत आणि अंधारात त्या काही नीट दिसत नाहीत. उजवे-डावे वळसे मारत पायऱ्यावरुन थोडं वर गेले की ...