अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
ही गोष्ट आहे ‘मॉन्ग थॉन्गडी’ या बारा वर्षाच्या एका मुलाची. मॉन्गचे आई-वडील मूळचे ब्रम्हदेशातल्या शान या अदिवासी जमातीचे. ब्रम्हदेशातल्या जुलमी राजवटीला ते कंटाळले व थायलंड मधे निर्वासित म्हणून आले व ‘चियान्ग माय’ या गावात स्थायिक झाले. या दोन देशांमधली सीमा अतिशय घनदाट अशा जंगली प्रदेशातून जाते. ब्रम्हदेश व या भागातल्या इतर देशांच्या मानाने, थायलंड हा देश बराच श्रीमंत असल्याने, येथे कारखाने, शेत मजूर व घरगुती कामासाठी नोकर्या सहजपणे उपलब्ध होतात. ही जंगली सीमा पार करून आलेले अंदाजे 20 लाख तरी निर्वासित, थायलंडमधे वास्तव्य करून ...
पुढे वाचा. : स्वप्न आणि लाल फीत