टिळकांबद्दल आदर असेल तर टिळकांना, टिळकांचे, टिळकांकडे असे म्हटले जाते टिळकाला, टिळकाचे, टिळकाकडे नाही. म्हणजे बहुधा अनेकवचनाप्रमाणे सामान्य रुप केले जात असावे.
तसेच जोशांना, साठ्यांचे, वेलणकरांकडे वगैरे. पण प्रथम नाम आदरार्थी कसे वापरायचे?
संजयांना, सोनियांना? कधी कधी हे फार विचित्र वाटते. परागांना, नितिनांना, अर्चनांना वगैरे. मग त्याचे नितिन यांना, रमेश यांना असे रुप केले जाते पण हे शुद्ध आहे का? हया जागी कसे रुप असावे? की राव, पंत छापाचे काहीतरी शेपूट जोडून अशा वेळी मार्ग काढायचा?
नितिनरावांना, अमुकपंतांना इत्यादी.