रुद्र शक्ति येथे हे वाचायला मिळाले:
ताप उतरल्यावर लगेच मेघनाला घरी आणल. ताप सोडला तर बाकी सगळ ठीक होत पण तिने ताप चांगलाच अंगावर काढला होता. तिल घरी येऊन एक आठवडा व्हायला आला होता तरी तिचा थकवा काही जायच नाव घेत नव्हता. घरच्यांपुढे एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की तिला अचानक एवढा फणफणुन ताप यायला झाल काय? डॉक्टरांनाही काहीच कळेना. शहरात कुठली साथ वगैरे सुध्दा सुरु नव्हती. अजुन काही कमी असेल तर घरी आणल्यापासुन मेघना पहिल्यासारखी वागत नव्हती. नुसती शांत बसुन असायची. तशी ती फार बोलकी होती अस नाही पण तिने आता एकदम अबोला धरला. तिच तापातल असंबंध बोलण बघुन डॉक्टरांनी काही मानसिक तर ...