प्रजनन आणि ब्रह्मरंध्राबद्दल साशंक आहे. म्हणजे त्यांची गणना ह्य ९ द्वारात होते की नाही ह्याबद्दल.
प्रजननद्वाराबद्दल जास्त साशंक. कारण ब्रह्मरंध्र हे टाळूलाच म्हणतात.
दासबोधात - जन्मदुःखनिरूपण समासात- ''मस्तकद्वारे सांडी श्वास'' असाही उल्लेख आहे.
मातृगर्भात असतानाचे जीवाचे श्वसन हे त्या 'द्वाराने' होते असे म्हटले आहे. पुढे ते द्वार बंद झाले, की मग प्रसूतीवेळ जवळ आली असा अर्थ होतो.

माझ्या माहितीप्रमाणे ह्या नऊ द्वारांमध्ये डोळेही समाविष्ट असावेत कारण तिथे 'धनंजय' नावाचा प्राण असतो जो की डोळ्यांची उघडझाप कार्यान्वित करतो. आणि ब्रह्मरंध्र हे बुजलेले असल्याने कदाचित त्याचा ९ द्वारांमध्ये समावेश होत नसावा.
त्यामुळे,
प्रजनन आणि ब्रह्मरंध्र ह्या द्वारांऐवजी दोन 'डोळे' घेता यावेत.
मलाही धड माहिती नाही, त्यामुळे चूभूदेघे.
अधिक माहिती मिळाल्यास नक्की देईन.