शरीराची नऊ द्वारे नक्की कोणती ह्याबद्दल खाली भोमेकाका आणि माझा प्रतिसाद वाचावा.

ह्या नऊ द्वारांशी संलग्न प्राण कोणते, त्याबद्दल मत्स्येंद्रनाथांच्या 'योगविषया'मध्ये एक श्लोक मिळाला, परंतु त्यात १० प्राण सांगितले आहेत.

प्राणोऽपानः समानश्च उदानो व्यान एव च ।
पञ्चकर्मेन्द्रियैर्युक्ता: क्रियाशक्तिसमुद्यता: ॥
नागः कूर्मश्च कृकरो देवदत्तो धनञ्जयः ।
पञ्चज्ञानेन्द्रियैर्युक्ता: बुद्धिशक्तिसमन्विताः ॥

अर्थात- प्राण अपान समान उदान व्यान हे पाच प्राण कर्मेंद्रियांशी संलग्न.
        तर नाग, कूर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय, हे पाच ज्ञानेंद्रियांशी संलग्न. पैकी धनंजय हा प्राण डोळ्यांच्या उघडझापीशी निगडीत असल्याचे आमच्या शिक्षकांनी सांगितल्याचे आठवते.
वरील दहापैकी जो 'प्राण' तो शरीरात सर्वत्र संचार करतो असे म्हणतात. किंबहुना, तो सर्वांचा समूहवाचक शब्द म्हणून जास्त वापरला जातो.
त्यामुळे उरलेले नऊ प्राण हे नऊ द्वारांशी संलग्न असावेत असा अंदाज आहे. चूभूदेघे.
यावर कोणास अधिक माहिती असल्यास त्यांनी ती माहिती येथे द्यावी.