ज्यांना काहीजण इंग्रजी आकडे म्हणतात ते आकडे इंग्रजी नाहीत. त्या आकड्यांना हिंदू आकडे म्हणतात.

हिंदू अरबी आकडे ही माझ्या माहितीप्रमाणे लिपी नसून 'स्थानिक किंमत - मूळ किंमत' पद्धत आहे. ह्या पद्धतीत एकापुढे एक लिहिलेले आकडे एका विशिष्ट गुणकाने एकमेकांशी संबंधित असतात. उदा. दशमान पद्धतीत ते १० ह्या गुणकाने तर षोडशमान पद्धतीत ते १६ ह्या गुणकाने संबंधित असतात. म्हणून २५ ह्या दशमान आकड्याची किंमत २*१० + ५ असते.

माझ्या माहितीप्रमाणे -

1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 0 ही आकडे लिहिण्याची लिपी अरबी आहे.
I, II, III, IV, V, VI, VII, VIII, IX, X ही आकडे लिहिण्याची लिपी रोमन आहे.
१, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, ० ही आकडे लिहिण्याची लिपी देवनागरी आहे.
۰, ۱, ۲, ۳, ۴, ۵, ۶, ۷, ۸, ۹ ही आकडे लिहिण्याची लिपी पर्शिअन आहे.
๐, ๑, ๒, ๓, ๔, ๕, ๖, ๗, ๘, ๙ ही आकडे लिहिण्याची लिपी थाई आहे.
...
...
...

काही चुकत असल्यास क्षमस्व. जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

प्रत्येक प्रांताने आपापले आकडे मोटार गाड्यांच्या नंबर प्लेटवर वापरायचे ठरवले तर अपघात करून पळून जाणाऱ्या गाडीचा शोध घेणे शक्य होणार नाही. परदेशातल्या चेकचे नंबर वाचता येणार नाहीत. बसचे नंबर, ट्रेनचे नंबर वाचता आले नाहीत तर भारतातच प्रवास करणे अशक्य होईल, परदेशात तर सोडूनच द्या. फार काय, परप्रांतातल्या घड्याळ्याने दाखवलेली वेळ समजणार नाही.

हे अगदी पूर्णपणे मान्य, १००% सहमत. पण मग वृत्तपत्रे कोणत्या गटात मोडतात ह्याचा खुलासा व्हावा ही अपेक्षा. कारण मूळ चर्चा ही मराठी वृत्तपत्रांमध्ये आकडे मराठी/देवनागरी लिपीत न लिहिता इंग्लिश/अरबी/हिंदू लिपीत लिहिले जातात ह्याविषयी आहे असे वाटते.