स्त्रियांच्या डब्यांत असें वागतात हें वाचून वाईट वाटलें. पुरुष प्रवासी मुलांना धोकादायक पद्धतीनें उभें राहूं देत नाहींत तसेंच अपशब्द उच्चारूं देत नाहींत. मीं सुद्धां वावगें वागल्यास (जरूर पडली तर मोठ्यांना पण) दटावतों. म्हणून हीं मुलें स्त्रियांच्या डब्यांत चढत असावींत. पण दम दिल्यास सरळ वागतात.

पोलीसांना बाहेर हाकलण्यापेक्षां त्यांच्याकडून भिकाऱ्यांचा, फेरीवाल्यांचा वा व्रात्य बंदोबस्त करून घ्या. हवें तर आपला हेतू साधण्यास त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवावें. प्रयत्न तर करून पाहा. नक्की उपयोग होईल. समाजातल्या प्रत्येक माणसांत बऱ्यावाईट प्रवृत्ती असतात. त्यांतल्या चांगल्या प्रवृत्तींना चालना देणें यांतच आपलें कौशल्य असतें. अर्थात हें बोलणें सोपें आहे. पण माझा तसा अनुभव आहे. अगदीं भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्याकडूनमीं लाच न देतां काम करून घेतलेलें आहे. जरूर प्रयत्न करा.

सुधीर कांदळकर.