मुंबईकरांच्या शब्दकोषातून हरवला आहे. कोणत्याही सिग्नलपाशीं पाहा. लाल दिवा पिवळा वा हिरवा झाला रे झाला कीं लगेच पाठीमागल्या अकराव्या वाहनाचा चालक शिंग जोरांत वाजवतो. पुढील दहा वाहनें निघायला दहा सेकंद लागणार हें देखील त्याला कळत नाहीं. हा संयमाचा अभाव ९९ टक्के मुंबईकरांत आढळतो. मग माणसें फालतू घाई करून जीव गमावतात. पुरुष प्रवासी रेलवे गाडींत चढतांना उतरतांना धक्का लागला तर सॉरी वगैरे म्हणत नाहींत, प्लीज बाजूला व्हा अशी सौजन्यानें विनंती न करतां सरळ धक्का देऊन जातात व मग भांडणें, प्रसंगीं मारामाऱ्या होतात. अगदीं पहिल्या वर्गांत देखील.


फ्रीमन (पहिलें नांव विसरलों) नांवाच्या एका लेखानें 'द ह्यूमन झू' म्हणून एक छान विचारप्रवर्तक पुस्तक लिहिलें आहे. हा लेखक लंडनच्या प्राणिसंग्रहालयाचा माजी क्युरेटर. टोळीच्या स्वरूपांत राहाणारा आदिमानव प्रथम गांवांत, मग वाड्यांत, मग शहरांतल्या छोट्या फ्लॅटमध्यें कोंडला गेला. जंगलांत मनसोक्त भटकणारें हिंस्त्र श्वापद पिंजऱ्यात कोंडल्यावर जसें विचित्र वागतें तस्साच माणूस देखील शहरांत गेल्यावर विचित्र वागतो अशी मानसशास्त्रीय विश्लेषणासह तुलना केली आहे. ती आठवण झाली.

सुधीर कांदळकर