आज फिर जीने की तमन्ना है
आज फिर (तुमपे) मरने का इरादा है' - तुम पे मरने के लिये जीने की तमन्ना है! वा!

हा अर्थ पटला नाही. चित्रपटामध्ये हे गाणे ज्यावेळी वहिदा म्हणते त्यावेळी ती देव आनंदच्या प्रेमात पडलेली नसते. फक्त नवऱ्याच्या जाचक बंधनातून मुक्त झाल्याने आपल्या आवडीचे आयुष्य जगायला मिळाल्याचा आनंद तिला झालेला आहे तो ती गाण्यातून व्यक्त करते आहे. शैलेंद्रने गाण्यातून नेमके हेच सुचवले आहे.

कांटोंसे खींच के आंचल तोड के बंधन मैंने बांधी पायल
कोई ना रोको दिल की उडान का दिल वो चला अ आ आ आ

आज फिर जीनेकी तमन्ना है आज फिर मरने का इरादा है..

यातल्या वरच्या ओळीचा अर्थ माझ्या मते आयुष्य संपूर्णपणे (चांगल्यावाईटासकट) उपभोगायची इच्छा आहे इतकाच आहे. पुढची कडवीही पहा.

कल के अंधेरोंसे निकल के देखा है आंखे मलते मलते
फूल ही फूल जिंदगी बहार है तय कर लिया

यातही "तय कर लिया" म्हणजे "कसला निश्चय केला?" देव आनंद वर प्रेम करायचा? माझ्या मते फक्त मनासारखे आयुष्य घालवायचा.

मैं हूं गुबार या तूफां हूं कोई बता दे मैं कहां हूं
डर है चक्कर मे कहीं खो न जाऊ (इथे ऊ वर अनुस्वार दिला तर ओम असे उठते आहे) रस्ता नया

त्यामुळे नायिका आनंदात आहे, स्वतःवर खुश आहे हाच अर्थ  गाण्यात आहे. म्हणूनच "(तुमपे) मरनेका इरादा है" असा अर्थ पटत नाही.

विनायक