वृत्तविभागानें द्यावें तसें वृत्त वाटलें. लिखाण वेधक, पकड घेणारें आहे, वेगवान आहे, पण कथेचा आत्मा कुठेंतरी हरवलेला वाटला.

पात्रांची स्वभाववैशिष्ट्यें, त्यांच्या परस्परसंबंधांतल्या नात्यांच्या गुंतागुंती, पात्रांच्या मनांत उठणारे भावनांचे तरंग, भावनांचीं आंदोलनें, विविध घटनांची गुंफण, त्या घटनांमुळें पात्रांच्या आयुष्यावर झालेला परिणाम, इ. चांगल्या कथेचीं वैशिष्ट्यें आढळलीं नाहींत. हंस अकेला या कथासंग्रहांत मेघना पेठेंनीं अशा कथावस्तूवरची कथा लिहिली आहे. जरूर वाचा.

असो.