हिंदू अंकलिखाण पद्धतीप्रामाणे जे आकडे लिहिले जातात त्यांना हिंदू पद्धतीचे आकडे म्हणतात. हे मूळचे ब्राह्मी. या अंकांच्या लिखाणात शुंग, शक, कुशाण, आंध्र आणि गुप्त यांच्या काळात फेरफार होत गेले आणि शेवटी नागरी अंक प्रचारात आले. हे अरबस्तानमार्गे थोडेफार बदलत बदलत जगभर पसरले. त्यामुळे या अंकांना हिंदू-अरेबिक न्यूमरल्स म्हणू लागले. आपण त्यांना हिंदू अंक म्हणतो आणि पाश्चात्य अरेबिक आकडे.
खुद्द देवनागरीत, अंक लिहिण्याच्या किमान दोन लिप्या आहेत. हिंदी आणि मराठी. अजूनही हिंदी मुलखात हिंदी आकडे शिकवतात, आपण वापरतो तसले मराठी आकडे नाही.
वर्तमानपत्रात जर वैज्ञानिक किंवा गणितावरचे लेख असतील, तर त्या लेखापुरते हिंदू अंक वापरावे आणि अन्यत्र मराठी. (आणि तसे ते वापरले जातातच). सामान्य मराठी माणसे वर्तमानपत्रांत येते तेवढेच लेखन ललित समजून वाचतात, म्हणून मराठी संस्कृती टिकवण्यासाठी मराठी अंक वापरणे उचित.
वर्तमानपत्राच्या पहिल्या आणि शेवटच्या पानावर जेथे तारीख आणि रजिस्टर नंबर असतो, तो हिंदू आकड्यात असावा. तसे न केल्यास हे काहीतरी सांकेतिक लिखाण आहे असे समजून परदेशात ते सेन्सॉर केले जाईल.