माझी सह्यभ्रमंती ... ! येथे हे वाचायला मिळाले:

सुळक्याची चढण सुरू होताना पहिले ६-८ फुट 'फ्री क्लाइम्बिंग' करून चढावे लागते. त्या खालच्या छोट्याश्या प्रस्तरावर उभे राहिले तरी नेमके कसे चढायचे ते समजते. आमच्यामध्ये राजेश हा पक्का गिर्यारोहक. डोंगरामधला त्याचा अनुभवसुद्धा साधारण १५ वर्षे... तितकाच दांडगा. पहिला तोच वर चढून गेला. त्या मागोमाग सुमेधा आणि मग शेफाली. 'फ्री क्लाइम्बिंग' करताना एक गोष्ट नेहमी करावी ती म्हणजे चढणाऱ्याच्या मागे म्हणजेच खाली कोणीतरी आधार द्यायला उभे रहावे. न जाणो पटकन चढणाऱ्याला आधार द्यावा लागल तरं ??? तसेच वरच्या बाजूला सुद्धा कोणीतरी होल्ड्स कुठे आहेत ते ...
पुढे वाचा. : भाग ३ - गोरखगड ... !