कवितेचें नांव The Inn असलें तरी विकीपेडियावर प्रत्यक्षांत कवितेचें नांव Up-Hill दिसतें आहे. मला शाळेतल्या पाठ्यपुस्तकांतले नांव बरोबर आठवत आहे कारण ही कविता शिकवत असतांना मिं कांहींतरी वात्रटपणा केला होता आणि माझ्या बाजूला बसणाऱ्याला शिक्षा म्हणून ही कविता दहा वेळां लिहावी लागली होती. ते सर मुलां खोड्या काढल्यास वा मस्ती केल्यास दहा ते शंभर ओळी लिहायला लावीत. (अर्थात पुस्तकातल्या ओळी, वहीतल्या नव्हेत. नाहींतर मोठीं अक्षरें लिहून सुटका झाली असती)
दुसरी गोष्ट म्हणजे माझी मराठी कविता समजतांना मारामार, तर इंग्रजी कवितेच्या वाटेला कशाला जाईन? तर मोजक्याच इंग्र्जी कविता ठाऊक असल्यामुळें चूक होण्याची शक्यता कमी.
जास्त रोमन अक्षरें प्रतिसादांत स्वीकारली जात नाहींत म्हणून व्य नि मधून दुवा दिला आहे.
सुधीर कांदळकर