व्हीके,
आपले लेख खूप ओघवते आणि काही प्रमाणात माहितीपूर्ण आहेत, आपल्या जीवनातील चौफेर प्रवास त्यांतून दिसतो (एक प्रादेशिक उल्लेख खटकतो, पण कदाचित आपल्या अनुभवाला काही अतिरेक आला असेल तो आपण निर्व्याजपणे मांडला आहे).
आपल्या आईच्या प्रतिक्रियेबद्दल - कदाचित सतत आपल्या मुलाचे अपयश पाहून आईचे असे पुर्वग्रहदूषित मत तर झाले नसेल? आपल्याला मानसिक पाठिंबा आहे, पण आपल्या आईलाही कदचित त्यांच्या आयुष्यात काही कारणाने असे वैफल्य आले असू शकते असे जाणवले.
कोणतीच अपेक्षा न ठेवता लिहिलेले आपले मनमोकळे विचार - आणखी जरूर लिहा.
- मीसुचि.