जी स्वतः डॉक्टर आहे तिला कोणाच्या आधाराची गरजच काय? जेव्हा तिने प्रेम केले तेव्हा ठीक होते. पण एकदा एका पुरुषाचा अनुभव घेतल्यावर पुन्हा केवळ आई-वडिलांसाठी तिने बळी जावे हे पटत नाही. शिवाय मुलीला डॉक्टर बनविणाऱ्या आई-वडिलांना मुलीची काळजी असली तरी ती ज्या परिस्थितीत परत आली हे कळत नाही का? एकदाचे मुलीचे लग्न झाले म्हणजे आपण "सुटलो" ही भावना निदान  त्यांची असू नये. आज जगात अनेक मुली एकट्या राहूनही करियर करत आहेतच. तिने परिस्थितीला शरण जाऊ नये असे मनापासून वाटते.