माझे आजोबा निष्णात ऍलोपॅथिक डॉक्टर (कान-नाक-घसा तज्ज्ञ) होते. अनेकदा ते आयुर्वेदाचीही मदत घेत असत. लहानपणी मला कावीळ झालेली असताना त्यांच्या वहीनुसार एरंडाच्या पानांचा रस घेतला होता. (एरंड्यांच्या पानांचा रस आणि उसाचा रस हे कॉकटेल तीन दिवस सुरू होते.) तिसऱ्या दिवशी मी बरा झालेलो होतो.