तमिळनाडू मध्ये जर शासकिय अनुदान प्राप्त शाळेत हिंदी शिकविले तर त्याचे अनुदान रद्द होउ शकते. पण प्रत्येक लहान मोठ्या शहरात हिंदी शिकविण्याचे वर्ग असतात त्याला पुरेशी मागणी आणि पुरवठाही असतो.

१९४७ पर्यंत दक्षिणेत हिंदी भाषिक नेत्याना मान सन्मान व मागणी होती पण जर दिल्ली मधिल करिशिमटिक नेत्रुत्व येथे आले तर आपली प्रतिमा कमजोर पडेल या भीतिने दक्षिणेतिल स्थानिक नेत्यानी हिंदीची लोकप्रियता मर्यादितच राहिल असे बघितले. याला एकच सन्माननीय अपवाद म्हणजे श्री पट्टाभी सितारामैया ते शेवटपर्यंत हिंदितच बोलत आणि त्यांचे पत्रव्यवहारही हिंदितच असे. त्यानेच फक्त आंध्र प्रदेशात हिंदी विषयात १०० पैकी ३० गुण जरी मिळाले तरी पास करितात असे हिंदी उत्तेजन दिले जाते. केरळातही हिंदी ला पोषक असे वातावरण आहे. कर्नाटकाची परिस्थिती तमिळनाडू सारखिच आहे.

पण हिंदी शिकणे हे जबरदस्तिने साध्य होणे अभिप्रेत नसावे. ते मनापासुनच यावे लागते. हिंदी भाषिकजनता देखिल हिंदी भाषेस मनापासून प्रेम करते असे कुठे दिसते. श्री नरेंद्र शर्मा यांचा हिंदी पखवाडा यावर मार्मिक कोमेंट अशी कि " हिंदी दिवस हा पित्र पक्षातच का असतो - जणू काही हिंदी भाषेचे आपण तसे देणे फेडून तिला पुर्वजांची भाषा असेच तर नाही समजत? "