अतिशय सुरेख पाककृती. खूपच आवडली. वाचता वाचताच तोंडाला पाणी सुटत होते :)
................
या लाल भोपळ्याची (यालाच काशीफळ भोपळा असेही म्हणतात ना ? ) भाजी / भरीत करावे , तर माझ्या आईनेच, (असे माझ्याप्रमाणेच आपापल्या आईमंडळींबाबत इतर अनेकांना वाटू शकेल !!!) असे मी बेलाशक म्हणू शकतो. फार छान करायची ती ही भाजी.
..................
तुमच्या या 'भरता'त मी आणखी थोडी 'भर' घालू इच्छितो.
ती अशी - तुम्ही याच पाककृतीला जिऱयांऐवजी मेथीच्या दाण्यांची फोडणी देऊन पाहा...आणि मग बोला !
..................
लाल भोपळा म्हटले की मेथीच्या दाण्यांची फोडणी ही आलीच पाहिजे!!! हे चिमुकले दाणे जिभेची चवच बदलून टाकतात. असो. {आता तोंडाला पूर येऊ लागला आहे :) थांबलेच पाहिजे !}
..................
पुन्हा एकदा धन्यवाद उत्कृष्ट पाककृती सादर केल्याबद्दल.