तमिळ आणि मल्याळम लिपीतही पूर्वी स्वतंत्र आकडे होते. त्यांचे काही सांगू नका. मद्रासी माणसाच्या नावाची आद्याक्षरे रोमन असतात. ग. त्र्यं. (माडखोलकर) किंवा श्री. व्यं. (केतकर) अशी मद्रासी किंवा केरळी लोकांची आद्याक्षरे असल्याचे कधी ऐकले आहे? मल्याळी लोकांनी तर आपल्या लिपीत सुधारणेच्या नावाखाली इतका गोंधळ घातल्याचे ऐकले आहे, की आता नव्या पिढीतल्या मुलांना धड जुनी मलयालम वाचता येत नाही, ना नवी.
बाकी आद्याक्षरे रोमन ठेवून मल्याळ्यांनी आपल्यावर केवढे उपकार केले आहेत. उषा नावाच्या केरळी धावपटूचे नाव पिलवुलकंडी तेक्केपरंबिल असल्याचे आधी माहीत असते तर तिचे नाव लिहायला ऑलिंपिक स्पर्धेच्या उमेदवारांच्या यादीत जागा नाही, असे सांगून त्यांनी तिला केरळात परत पाठवले असते.