छान. वाचून मलाही माझा हार्बर लाईनचा पहिला लोकल ट्रेन प्रवास आठवला. मला चुनाभट्टी स्टेशनला जायचे होते. त्यामुळे त्या आधी येणारे स्टेशन कुठले हे विचारून ठेवले होते. म्हणजे उठून दाराच्या दिशेने जाता येईल आणि चुनाभट्टीला उतरता येईल असा विचार केला होता. सगळ्यांनी कोळीवाड्याच्या पुढचे स्टेशन चुनाभट्टी असे सांगितले. प्रत्येक स्टेशनवर पाट्या नीट वाचत होते.पण प्रत्यक्षात 'कोळीवाडा' असे स्टेशन काही आलेच नाही.  त्यामुळे गाडीतच बसून राहिले. चुनाभट्टी स्टेशन कोळीवाडा न येता एकदम कसे आले हे कळेना. अर्थातच तिथे उतरता आले नाही. (ज्या स्टेशनवर 'गुरू तेग बहाद्दुज नगर' अशी पाटी होती तेच कोळीवाडा असे नंतर कळले)