तसेच हिटलर आणि भारतिय स्वातंत्र्य हे समीकरण एक सारखेच आहे. तात्कालीन कारण हे सर्व समावेशक किन्वा संपुर्ण कारण असू शकत नाहि. तसे पाहता खुपशी आशियन व आफ्रिकन देशही त्याच सुमारास स्वतंत्र झाले त्यालाही कारण हिटलर आहे काय? आंतर्राष्ट्रिय राजकारण व तात्कालीन राजकिय परिस्थिती तशी होती.

भारतिय नेत्यांचे / स्वातंत्र्य सैनिकांचे श्रेय हे निर्विवादच आहे. असे नाही कि आपोआप स्वातंत्र्य मिळाले - "रणाविना स्वातंत्र्य कुणा मिळाले?" आपण सारेच त्यांचे कृतज्ञ आहोतच.

दुसरा तर्क असा दिला जातो कि युद्ध हे वैज्ञानिक सन्शोधनास वाव देणारे कारण आहे असाही एक मतप्रवाह आहे त्यालाही काही आधार नाहि. चीन मध्ये फटाक्यांचा नोटांचा इ. शोध लागत होते तेव्हा कुठे चीन मध्ये युद्धसद्रुश्य वातावरण / परिस्थिति होती ?