शेंदणे किंवा उपसणे हे नेहमी वरच्या दिशेने असते असे वाटते. शिवाय या दोनही क्रिया आपोआप होणाऱ्या नाहीत. ही रूपे एखाद्या मूळ धातूची प्रयोजके असल्यासारखी आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी मूळ धातू बनवावा लागेल. शेंदणेच्या बाबत असे केल्यास शिंदणे हा धातू होईल. फेडणे पासून फिटणे, तोडणेपासून तुटणे, सोडणेपासून सुटणे तसेच मारणेपासून मरणे, यां धर्तीवर असा धातू आणि त्यामुळे शिंदण असे नाम मिळवता येईल. वरशिंदण आणि खालशिंदण असे शब्द रुजवले तर अर्थ समजण्यासाठी स्पष्टीकरण लागावे न लागल्याने हे नवीन शब्द रूढ होऊ शकतील.
उपसणेच्या विरुद्ध अपसणे? आणि मग, उपसा/हपसाविरुद्ध अपसा.
मराठीत वर येणे यासाठी उफाळणे हा एक शब्द आहे, पण याचा अर्थ उसळून वर येणे असा काहीसा आहे. (केला जरी पोत बळेचि खाले, ज्वाळा तरी ते वरती उफाळे!) यापासून 'उफळा'सारखा शब्द बनवता येईल?
जिवंत झरा असलेल्या कोरड्या विहिरीत झिरपतझिरपत पाणी वरवर येते त्या क्रियेला काय म्हणतात?
अवांतरः लागावे न लागल्याने(लागावे लागू नये) हे 'had had'सारखे चालायला हरकत नाही.