बेफिकीरजी अगदी मनातले बोललात. मी देखील अमिताभची "पंखा" आहे. जेव्हा त्याचे "सत्ते पे सत्ता" चे शुटिंग चालू होते तेव्हा दिवसभर (सकाळी ११/११.३० पासून ते संध्याकाळी ५ वाजे पर्यंत) इंदिरा डॉक मध्ये थांबून शेवटी त्याला बघून आणि त्याची सही घेऊनच मी निश्चिंत पणे घरी गेले. तो "मिलेनियम स्टार" झाला यातच काय ते आले. जशा अँग्री यंग मॅन च्या भूमिका त्याला डोळ्यासमोर ठेवून लिहिल्या गेल्या तसेच हे "मिलेनियम स्टारपद" त्याच्यासाठीच निर्माण झाले. हे पद मिळवणारा तोच एकटा आहे. त्याच्या आधीही कोणी नव्हते आणि नंतर पण कोणी असूच शकत नाही. देवाने माझे उर्वरित सर्व आयुष्य त्याला द्यावे. हीच त्याच्या चरणी प्रार्थना.