शुद्ध मराठी, मी तुमच्याशी सहमत आहे. आपण आपल्या भाषेचा अभिमान बाळगला नाही तर दुसऱ्या कोणाचे काय नुकसान होणार आहे?  मराठी वर्तमान पत्रात किंवा पुस्तकात मराठी आकडेच असावे हे योग्यच आहे. मराठी माणसाला इंगजीचे जास्त वेड आहे. हेही खरेच. दोन "उच्चभ्रू" मराठी माणसे एकत्र आली की आपोआप इंग्रजी फाडायला सुरूवात होते हा माझा अनुभव आहे. म्हणूनच तर राज ठाकरेंना मराठीसाठी आंदोलने करावी लागतात आणि आपण असे करंटे की त्यांनाच विरोध करत बसतो. या वेळी आपल्याला भारताची घटना आठवते. "कोणालाही कुठेही जाऊन रहायची परवानगी आहे" असे गळे काढणारी हीच मराठी माणसे आहेत.  यांच्यापासूनच महाराष्ट्राला खरा धोका आहे.