असून त्यांच्यावर ब्रिटिशांचें राज्य आहे हें बरोबरच आहे असे हिटलरनें म्हटलें आहे असें माझ्या स्मरणानुसार वि. ग. कानिटकरांच्या नाझी भस्मासुराचा उदयास्त यांत लिहिलें आहे. आत्तां या क्षणीं तें पुस्तक माझ्याकडे नाहीं त्यामुळें मीं ताडून पाहूं शकत नाहीं.
पण प्रस्तुत विधानाला ग्रंथाधार, ग्रंथनाम, प्रकाशनाची तारीख, ग्रंथलेखकाचें नांव, पृष्ठ क्रमांक असा ठोस आधार दिलेला नाहीं. अनुकूल मतांचें समर्थन तसेंच विरुद्ध मतांचें खंडन अशी चर्चा केलेली नाहीं. विधान निव्वळ स्वतःचें असल्यास तर्कशुद्ध कारणमीमांसा दिलेली नाहीं. त्यामुळें विधान तर्कदुष्ट देखील नाहीं तर भोंगळ समजून सोडून द्यावें.
सुधीर कांदळकर
सुधीर कांदळकर.