Histotrie universelle des chiffres या नावाच्या एका जाडजूड ग्रंथाचे इंग्रजी भाषान्तर मी नुकतेच वाचले. हा ग्रंथ जॉर्जेस इफ्राह नावाच्या मोरोक्कन माणसाने मूळ फ़्रेन्चमध्ये लिहिला आहे. त्यातले काही उल्लेखः-
"संख्येमधल्या आकड्याच्या क्रमवारी(पोझिशन)नुसार त्या आकड्याची किंमत ठरणे ही कल्पना मूळची हिंदूंची नाही. दुसऱ्या शतकात बाबिलॉनियन लोकांना ही कल्पना प्रथम सुचली, आणि त्याचवेळी चिनी गणितज्ञांना. त्यानंतर पुढे, तिसऱ्या ते पाचव्या शतकांदरम्यान (माया संस्कृतीतल्या) मायन खगोलशास्त्रींना, आणि शेवटी, पाचव्या शतकातल्या हिंदूंना. पहिल्या तिघांना शून्याचा शोध मात्र लावता आला नाही, ती हिंदूंचीच निर्मिती. शून्य ते नऊ या अंकाची, हिंदूंनी ठरवलेली सुरुवातीची चिन्हे अरबांमार्फत सर्व जगात पोचली. त्यांच्या मूळ दिसण्यात काळ, वेळ आणि प्रवासामुळे थोडाफार(समव्हॉट) फरक पडला. पण ज्यांना आपण अरेबिक आकडे समजतो ते हे मूळ अंक, खरे पाहिले असता(रिअली), हिदुस्थानीच."
अंकलेखनाच्या कलेची आणि शास्त्राची सर्वांगीण माहिती देण्यासाठी, सुमारे साडेसहाशे पानांचा डेमी आकारातील हा ग्रंथ लिहून, लेखकाने जुन्यात जुन्या मेसोपोटेमिया, दक्षिण अमेरिका, अरबी भूप्रदेश आणि मुख्य म्हणजे भारत, यांच्यासारख्या देशांच्या अभिजात संस्कृतींद्वारे वाचकाला युरोपापासून ते चीनपर्यंत सफर घडवून आणली आहे.
ग्रंथाचे प्रकाशकः The Harvill Press, London. छापील किंमत वीस पौन्ड, माझी खरेदी किंमत भारतीय रुपये १४०८/- फक्त.