गिरगावातल्या एका हुशार आणि प्रख्यात भाषाशिक्षकाने मला इंग्रजीतले तीनचार शब्द शोधायला काही वर्षांपूर्वी सांगितले होते. त्यांतला एक शब्द जळमट, कोळिष्टक हा होता. अनेक इंग्रजी तज्ज्ञांना विचारून आणि भरपूर शोधाशोध करूनही मला योग्य शब्द मिळाला नाही. कॉबवेब म्हणजे कोळ्याचे जाळे, जळमट/कोळिष्टक नव्हे.