संख्येमधल्या आकड्याच्या क्रमवारी(पोझिशन)नुसार त्या आकड्याची किंमत ठरणे ही कल्पना मूळची हिंदूंची नाही.   दुसऱ्या शतकात बाबिलॉनियन लोकांना ही कल्पना प्रथम सुचली, आणि त्याचवेळी चिनी गणितज्ञांना. त्यानंतर पुढे, तिसऱ्या ते पाचव्या शतकांदरम्यान (माया संस्कृतीतल्या) मायन खगोलशास्त्रींना, आणि शेवटी, पाचव्या शतकातल्या हिंदूंना.  पहिल्या तिघांना शून्याचा शोध मात्र लावता आला नाही, ती हिंदूंचीच निर्मिती.

शून्याअभावी पहिले तिघे एकंदहं (किंवा तत्सम) पद्धत नेमकी कशा प्रकारे वापरत होते ते समजल्यास रोचक ठरावे.

जॉर्जेस इफ्राह

फ्रेंचमधील Georgesचा उच्चार 'जॉर्जऽ' असा काहीसा (म्हणजे शेवटचा s अनुच्चारित पण अंत्याक्षर हलन्त नव्हे; अंत्य 'अ' उच्चारित आणि दीर्घ.) व्हावा, असे वाटते. (त्यातसुद्धा दोन्ही 'ज'चा उच्चार खास फ्रेंच पद्धतीने काहीसा hissing [मराठी? ] व्हावा. म्हणजे काहीसा नुक्ता दिल्यासारखा पण तरीही जिन्यातलाच 'ज'. म्हणजे म्हणताना जिन्यातलाच 'ज' म्हणायचा, जहाजातला 'ज' नव्हे, पण तो म्हणताना जीभ आणि टाळू यांच्यातून थोडी हवा जाऊ द्यायची. एकंदरीत जेट इंजिनासारखा आवाज काढायचा.)

फ्रेंचतज्ज्ञांनी आणि भाषा/उच्चारतज्ज्ञांनी योग्य तो खुलासा करावा.