विचार सागरातील सुंदर तरंग... येथे हे वाचायला मिळाले:

किती गणितं सोडवतोस दिवसाला?

"ऐला! म्हणजे तुम्हाला परिक्षेत फक्त गणितं सोडवायची असतात?" दुपारी २ च्या अत्यंत शुभसूचक वेळी अमृताचा (निळी टोपी वाले ह्याला "चहा" म्हणतात) चषक हाती असताना, एका बेसावध क्षणी, एकीने मला फुलटॉस वर क्लीन बोल्ड केला. लोकहो, थांबा. हा प्रश्न वरवर जितका हास्यास्पद दिसतो, तितका बावळट मुळीच नाही. ह्याच्या मुळाशी गणित ह्या विषयाबद्दल समाजात असलेलं अज्ञान दडलेलं आहे. पोरगं गणितात PhD करतंय म्हटल्यावर लोक अक्षरश: चेकाळतात, आणि असे काही प्रश्न विचारतात, की विचारता सोय नाही! यंदाच्या सुट्टीत तर लोकांनी कहर केला. "काय ...
पुढे वाचा. : किती गणितं सोडवतोस दिवसाला?"ऐला! म्हणजे तुम्हाला परिक्षेत