अष्टाक्षरीचा सुंदर नमुना.
चित्तरंजन बहुतेक तुम्हाला गज़ल लिहिण्यास सांगत आहेत.
अगदी आधी आधी खाजगी दूर चित्रवाहिन्या नव्ह्त्या त्या वेळी
मनोरंजनाची सारी भिस्त दूरदर्शनवर होती. साधरण १९८८ च्या  त्यावेळी 'मन वढाय वढाय' नावाची एक मालिका दाखवली जायची,  बहुतेक ती बहिणाबाईवर होती. त्याच बरोबर 'गोट्या' या मालिकेचे गीतही ओघाओघात आठ्वले. तोही असाच अष्टाक्षरीचा सुंदर नमुना म्हणता येईल.

बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात  ॥ धृ॥
बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या राती, चंद किरणांची साथ ॥ १॥
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात

बऱ्याच दिवसांनी ते जुने दिवसही आठवले ....
धन्यवाद
-यादगार