मुळात माझ्या कथेतील आसावरी डॉक्टर असली तरी शेवटी एक स्त्री आहे. आणी अस कोन म्हणतो की डॉक्टर असणाऱ्यांना भावना नसतात,जगण्यासाठी आधार लागत नाही.स्वतःची काहीच चुका नसताना जेव्हा एखादी शिक्षा मिळते तेव्हा माणूस स्वतःच्या अस्तित्वाच्या पलीकडे जातो  आणि तिथे विचारच उरत नाही की मी कोण आहे; मला स्वतःचे निर्णय कधी आणि कसे घ्यायचे आहेत.

अवघ्या वयाच्या २४व्या वर्षी ज्याच्यावर आपण प्रेम केल त्या माणसाकडून घटस्फोट घ्यावा लागला अशा स्त्रिची अवस्था(भले ति डॉक्टर असली तरी )काय होइल हे मि तुम्हाला सांगायला नको.

आणि जरी एखादा घटस्फोटित डॉक्टर मिळाला तरी त्याला प्रथम वधुच हवी असते जशी काळ्या मुलाला गोरिच बायको हवी असते.

अन तिथेही शेवती अगतिकताच असते.