चित्त,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

>>कुठलेच दुःख नाही ह्याचे दुःख आहे की काय असे वाटून गेले.

असे नक्कीच नाही.
थोडक्यात सांगायचं तर, 'सुचणारी दुःखे' म्हणजे, आजूबाजूला मी जे काही बघतो, त्यावर चिंतन घडते. त्यातल्याच एखाद्या व्यक्तीला असलेले दुःख जाणवते, वाईट वाटते.
नंतर काही दिवसांनी हे सगळंच चिंतन कुठल्या ना कुठल्या स्वरूपात बाहेर पडू बघते. माझ्याकडे त्यासाठी लेखणी आहे. पण ते बाहेर पडू पाहणारे दुःख मी लिहीत नाही. ती/त्या व्यक्ती कोण? त्यांचं नाव काय हेही मला ठाऊक नसते. त्यांना (मला जाणवलेल्या दुःखाहूनही खोल असे काही तरी)  दुःख असेल असे वाटते, म्हणून त्या दुःखाला/ दुःखांना 'अनाम' म्हटले आहे.
ते दुःख लिहायची इच्छा होऊनही मी ते लिहीत नाही हे दुःख आहे. असो...

>>संस्कृतात यमके पाळण्याचे बंधन नाही, असे वाटते.

हा बादरायण संबंध कळलाच पाहिजे असे नाही, पण कळला असता तर बरे झाले असते असे वाटते.
तुमचे वरील वाक्य वाचून कविता पुन्हा एकदा वाचून पाहिली, आणि ती मराठीच असल्याचं कन्फर्म केलं. असो.
 ह्या कवितेत यमके पाळली गेली नाहीत हे मान्य. पण ती अक्षम्य चूक आहे असे मला वाटत नाही.
बाकी कवितेकडे बघण्याचा कोणाचा दृष्टिकोन कसा असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या मताचा आदर करून, थांबतो.

- चैतन्य.