माझ्यामते युरोपात अगदी युक्लिडपासून विज्ञान सुरु झाले. ग्यालिलियो (१५६४-१६४२), नेपियर (१५५०-१६१७), फिबोनाची, कोपर्निकस इत्यादी कितीतरी. एक महत्त्वाचा फरक म्हणजे नव्या शास्त्रज्ञांना जुन्या लोकांचे शोध माहित होते कारण त्यांची व्यवस्थित नोंद केली गेली. ते वापरुन त्यांनी विज्ञान पुढे नेले. आपल्या इकडे तसे झाले नाही. भास्कर, आर्यभट वगैरे कुणी फारसे वाचलेले दिसत नाहीत.
 न्युटनपासून दैदिप्यमान प्रगती सुरु झाली पण सुरवात आधी झाली होती. आपण ह्या सर्व काळात मागासलेलेच होतो.