पण मला चटकन ते वाक्य वाचून कळलेच नाही.
संस्कृतात यमकापेक्षाही अनुप्रास जास्त येतो असे मला वाटते. किंबहुना, यमकाची मराठीतली कन्सेप्ट संस्कृतात तितकीशी नाहीच असे म्हणायलाही हरकत नाही.यमके नाहीतच असे नाही, पण एखादे संस्कृत काव्य लिहिताना, यमके पाळायचे बंधन मात्र नक्कीच नसते. तिथे व्युत्पन्नत्वावर जास्त जोर असतो. बाकी प्रत्येक श्लोकाच्या शेवटी जर 'नमामि' किंवा 'पाहि मां' सारखे शब्द येत असतील तर त्यांना अंत्ययमक म्हणता येऊ शकते(चर्चेचा विषय ठरू शकतो). पण तरीही गझलेतील अंत्ययमक आणि हे अंत्ययमक खूपच वेगळे.
मी संस्कृतचा भक्त आहे. पण तरीही बराच कच्चा आहे हो
धन्यवाद,
चैतन्य.