नीता आंबेकर आणि मी श्रावणी यांच्याशी सहमत.

दोघेही उच्च शिक्षित आहेत तरीही 'मला खरंच लहान मुलं आवडत नाहीत. आणि मला मूल नकोय हा माझा अंतिम निर्णय आहे.'  हा महत्वाचा निर्णय अविनाशने आसावरीला लग्नापूर्वी सांगितला नव्हता, हे खटकते. तसेच यावर घटस्फोट घेण्याचा निर्णयही आसावरीचाच असताना 'नवऱ्याने सोडून दिलेली परित्यक्ता ' हा तिचा उल्लेखही खटकतो.
घटस्फोट इतक्या सहजासहजी मिळत नाही. समुपदेशक लग्न वाचवायचे प्रयत्न करतात. तरीही त्यांना या मुद्दयावर घटस्फोट मिळाला असेल तर नंतर अविनाशला उपरती होण्याची सुतराम शक्यता नाही. कथेत असे थोडे कच्चे दुवे आहेत असे वाटते. उदा. 'पण हळूहळू आसावरीला जाणवू लागलं की ति नसताना अविनाश खूपच गंभीर होतो, कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो'... ती नसताना हे जाणवणे कसे शक्य आहे?  'त्यांना आसावरीचा अभिमानच वाटला अन तिच्या नशिबाची कीवही आली.' आई-वडील कीव करतील आपल्या मुलीची? ..'तिला जि स्थळ यायची त्यांना मुलगी घटस्फोटित असली तरी विनापत्य हवी असायची अगदी मूल होण्याला असमर्थ असणारी.' या वाक्यातले 'मूल होण्याला असमर्थ असणारी' हे शब्द खटकले.