जर उदंचन म्हणजे पंपिंग असेल तर हा शब्द वापरावा की नाही असा प्रश्न पडला. अप/डाउनवेलिंग मध्ये एका ठिकाणचे पाणी इतरत्र स्थानांतरित झाल्याने त्या पाण्याची जागा दुसरीकडचे पाणी भरून काढते. अर्थात हे होण्यासाठीही बले कार्यरत असतातच, त्यात पंपिंग मध्ये '(बाह्य) बलपूर्वक' असा जो गर्भितार्थ असतो, तो नसतो, वा मला नको आहे.
मग शेंदण्यापासून केलेले शिंदण वापरल्यास प्रायोजक रूपाचा अर्थ जातो का? असल्यास शिंदण शब्दच योग्य ठरावा. शुद्धमराठी, महेश, चित्त, तुमचे आणि इतरांचे काय मत?