अपवेलिंग/डाउनवेलिंग म्हणजे काय ते पाहण्यासाठी मी दुवा क्र. १ हे पान पाहिले. तेथे वाऱ्यामुळे पाणी ओढले ढकलले गेल्याने हा परिणाम होतो असे कळले. त्यावरून अपवेलिंग म्हणजे उचलणे / उचलले जाणे आणि डाउनवेलिंग म्हणजे बुडणे / बुडवले जाणे असा अर्थ मी घेतला.

त्यासाठी ह्या जोड्या मला बऱ्या वाटल्या :

उत्तोलन (वर उचलणे) (दुवा क्र. २ )/ मज्जन = बुड(व? )णे (दुवा क्र. ३ )

उन्नयन = वर उचलणे (दुवा क्र. ४ )/ अवनयन = खाली ढकलणे (?)

शिवाय

उन्मज्जन (पाण्यातून वर येणे) (दुवा क्र. ५ )

निमज्जन (बुडणे) (दुवा क्र. ६ )

उच्चलन (उचलणे( (दुवा क्र. ७ )

हेही शब्द वापरता येण्यासारखे आहेत असे वाटते.