अनुवाद. नादमाधुर्यामुळे मुलांना पाठांतरासाठीही आवडेल.
कार्तवीर्य > सोमवंशीय एक राजा. कृतवीर्याचा पुत्र. यास सहस्त्रअर्जुन नांव होते. हा दत्त उपासक होता. अनुप देशावर राज्य करीत होता. दत्तात्रेयाच्या कृपेने यास सहस्त्र हात व सुवर्णरथ प्राप्त झाला होता. या रथाची गती कुठेही कुंठित होत नसे. याने रावणाला लीलेने पराभूत केले होते. याने ८५००० वर्षे राज्य केले. एकदां जमदग्नींच्या आश्रमात जाऊन याने होमधेनूचे वासरू हरण करून त्याच्या आश्रमाचा नाश केला, म्हणून जमदग्नीचा पुत्र परशुराम याने याचे हात तोडले व त्यास ठार मारले. याच्या स्मरणाने नष्ट वस्तू प्राप्त होतात, असा विश्वास आहे. याच्या हजारो पुत्रांपैकी पांच पुत्र परशुरामाबरोबर झालेल्या युद्धातून वाचले. ते जपध्वज, शूरसेन, वृषभ, मधू व ऊर्जित हे होत. (भार. पौरा. को.)