बाबिलोनियन पद्धतीत संख्यालेखनासाठी साठ हा आधारभूत आकडा होता. म्हणजे ही पद्धत सेक्झॅजेसिमल होती. साठ या अंकासाठी एका छोट्या आडव्या रेघेला लटकलेल्या वाय्‌चे चित्र होते. चित्र एकदा 'लिहिले' म्हणजे ६० आणि दोनदा म्हणजे १२०. अशीच, पण थोडी वेगळी चित्रे ३६००, २१६०००, १२९६००००, १० आणि १ साठी होती. त्यामुळे ७६५९ लिहायचे असेल तर ३६०० चे चित्र दोनदा, ६० चे सातदा, दहाचे तीनदा आणि एकचे नऊवेळा काढले की-- ३६००x२+६०x७+१०x३+१x९=७२००+४२०+३०+९=७६५९ लिहिले गेले. म्हणजे शून्याचा उपयोग न करता संख्या लिहिता यायच्या.

चिनी पद्धतीत असेच लिखाण, पण आधारभूत अंक १० धरून आणि माया पद्धतीत २० धरून. माया पद्धतीत संख्येतील घटक अंक एकाखाली एक येत. एक ते चार या अंकासाठी अनुक्रमे १ ते चार आडवे ठिपके(. .. ... ....). पाचसाठी आडवी रेघ. सहासाठी आडव्या रेघेवर एक ठिपका, वगैरे.    ७६५९ असे लिहायचे:-
.

.
....
....
==

पहिल्या टिंबाची किंमत ७२००, दुसऱ्याची ३६०, तिसऱ्या ओळीतल्या चार टिंबांची ८०, आणि चौथ्या ओळीतल्या चार आडव्या रेघा आणि चार टिंबे यांची ५+५+५+५+४=१९. ७२००+३६०+८०+१९=७६५९.  या मंडळींना शून्याची गरज पडलीच नाही.
.