दिवाकरजी,

आपल्या चारही रचना वाचल्या. पहिल्या कवितेवर मी दिलेली प्रतिक्रिया पुन्हा उधृत करीत नाही.
पण भावना तीच आहे. या चारही कविता अतिशय सुंदर आहेत.

तथापि, एक सूचना. रचना थोडी छंदात बसवली तर ती गेय होऊन चालीवर म्हणता येईल.
उदा.

मोठे कुंकू विशाल भाली, सुंदर रूप दिसे  मातेचे ।
नथ नाकी शोभे ती बरवी, नयनी तेज तसें झळके ॥

कृपया, या सूचनेचा राग मानू नये. मला जे सुचले ते लिहिले.