काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:
इंदौर म्हंट्लं की पहिले आठवते ते आहिल्या बाई होळकरांची छत्री - जी सध्या संपुर्णपणे दुर्लक्षित आहे, अगदी राजवाड्याच्याच वाटेवर डाव्या हाताला असलेली ही छ्त्री दिसली की माझे टेस्ट बड्स जागृत होतात. कारण सराफा बाजारला जातांना ह्या छत्री समोरुनच वळावं लागतं.इंदौरला राजवाड्या जवळच आहे सराफा बाजार. दिवसभर इथे सोने,चांदी इत्यादिंचा व्यवहार होतो. पण संध्याकाळ झाली की मग मात्र रस्त्यावर किंवा सराफा दुकानांच्या पायऱ्यावर लोकं आपले स्टॉल्स लावतात. तसे काही परमनंट स्टॉल्स पण आहेत इथे. इंदौरचे लोकं खाण्यापिण्याच्या बाबतित खुपच चोखंदळ आहेत. इथले ...
पुढे वाचा. : चविनं खाणार..इंदौरला