आणखी लिहा.
अगदी सहमत आहे. सध्या विविध भारतीवर रोज सकाळी ७.३० वाजता लोकगीतांवर आधारित हिंदी गाण्यांची माहिती देणारा 'एक धून दो रुप' हा एक सुरेख कार्यक्रम सुरु आहे. अनेक लोकप्रिय जुन्या व क्वचित नवीन गाण्यांचे मूळ उत्तर भारतातील लोकगीतांवर कसे आधारित आहे, काही लोकगीतांना शास्त्रीय रागांची बैठक आहे तर 'पिंजरेवाली मुनिया' सारख्या गाण्याचा कोणत्याही रागाशी काहीच संबंध नाही तरीही अनेक अप्रतिम लोकगीते या चालीवर बांधलेली आहेत अशा स्वरुपाचे उदाहरणांसह उत्कृष्ट विवेचन केले जाते. 'मुनिया' या लोकप्रिय गाण्याचे मूळ लोकगीत स्पष्ट करताना शैलेंद्रबाबत मार्मिक टिप्पण्या कार्यक्रमात करण्यात आल्या होत्या. हा लेख वाचून शैलेंद्रबाबत तशीच फार उत्तम माहिती मिळाली.
अशाच स्वरुपाचे उदाहरणांसकट दिलेले लेख वाचायला खूप आवडतील.