हिटलरशी लढताना इंग्रजांचे पेकाट मोडलेले नसते तर त्यांनी आपल्या दुधखुळ्या नेत्याना पाहून स्वातंत्र्य बक्षीस दिले असते काय?
झाशीची राणी झाशीपुरती लढली.
गांधींच्या तत्त्वज्ञानामुळे सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत स्वातंत्र्य मिळणे शक्य नाही. जे लोक मुळातच वसाहतवादी आहेत त्यांच्यासमोर एक गाल, दुसरा गाल, सारखे सारखे गाल पुढे करून काहीही होणे शक्य नाही. खेडेरचना, कमीतकमी अवलंबित्व या मार्गांनी आजची प्रगती झाली नसती. इंग्रज तर मुळीच गेले नसते.
मुळात 'भारत देश' ही संकल्पनाच अस्तित्वात नसल्यामुळे संघटीत लढा होणेच शक्य नव्हते. इंग्रज कायम संघटीत होते.
स्वातंत्र्याचे श्रेय कुणीच हिटलरला देऊ शकत नाही, तसेच स्वातंत्र्य हे अनेक घटकांमुळे मिळाले असणार हेही नक्की!
हिटलर जर इंग्रजांशी लढत नसता तर आपल्याला निदान १९४७मध्ये तरी स्वातंत्र्य मिळाले नसते.