सुरवातीच्या वर्णनावरून श्रमजीवी पार्श्वभूमी डोळ्यासमोर येते. नंतरच्या संवादांची वैचारिक पातळी व भाषाशैली या गोष्टी बुद्धिजीवी वर्गाच्या वाटतात.

विसंगती दिसते आहे खरी. पण नंतर विचार केला की 'बुद्धिजीवी' वर्गातल्या ह्या दोघांना 'श्रमजीवी' आयुष्य जगावे लागले असावे.  इथे पुण्यात 'श्रमजीवी' अमृततुल्य चहाच्या दुकानात मी 'बुद्धिजीवी' वाढपी बघितले आहेत. बहुधा  'दैव' नावाचा हिंस्र पशू  कुणाला कधी, कुठे व कसा फरफटत घेऊन जाईल काही सांगता येत नाही. आणि असेच काहीसे 'परिस्थिती' नावाच्या बयेबाबतही म्हणता येईल. तीही कुणाच्या हाती कधी तुणतुणं देईल काही सांगता येत नाही. म्हणून इथे सवलत (डिस्काउंट) द्यायला हरकत नाही. असो.